23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeमनोरंजनअजय देवगण-तब्बू पुन्हा एकत्र

अजय देवगण-तब्बू पुन्हा एकत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी सध्या प्रचंड धुमाकूळ घालतेय. तरुण कलाकारांना लाजवेल अशी या दोघांची केमिस्ट्री आहे. ‘दृश्यम’पासून तब्बू आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधला प्रत्येक सिनेमा सुपरहिट करत आहेत. ‘दृश्यम’नंतर ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे दे’, ‘दृश्यम २’ आणि आता ‘भोला’ सिनेमात अजय देवगण आणि तब्बू झळकले. ‘भोला’ नंतर तब्बू आणि अजय देवगणच्या नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

नीरज पांडे यांच्या आगामी ‘औरो में कहा दम था’ या नवीन सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमात तब्बू झळकणार हे निश्चित होते. पण आता या सिनेमात अजय देवगण झळकणार आहे हे सुद्धा निश्चित झालेय. तब्बू आणि अजय देवगण यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगणने सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नीरज पांडे आणि तब्बू दिसत आहेत.

नीरज पांडेचे चित्रपट अ‍ॅक्शन आणि थ्रिलर म्हणून ओळखले जातात. ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘अ वेनस्डे’ याशिवाय स्पेशल ऑप्स अशा सिनेमा आणि वेबसीरिजचे दिग्दर्शन नीरज पांडेंनी केले आहे.

आता ‘औरो में कहा दम था’ या सिनेमाच्या माध्यमातून नीरज पांडे पहिल्यांदाच रोमँटिक ड्रामा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात अजय देवगण-तब्बूचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. अभिनेता जिमी शेरगील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या