22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनअक्षय कुमारला केले जात आहे ट्रोल : बहिणीसाठी 'बुक' केले विमान

अक्षय कुमारला केले जात आहे ट्रोल : बहिणीसाठी ‘बुक’ केले विमान

एकमत ऑनलाईन

कोविड 19 संबंधित उपचारांचे प्रोटोकॉल पाळत त्यांनी या विमानातून प्रवास केला

मुंबई :  – देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असल्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मात्रा, वाहतूकीसाठी काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांनंतर लोक विमान प्रवास करत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने त्याची बहीण आणि मुलांसाठी संपूर्ण विमानच बुक केले आहे. अक्षयने हे सर्व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी केले असले तरी नेटकर्‍यांना आवडले नाही. त्यांनी सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली.

देशाची सेवा करण्यासाठी तत्पर असणारा अक्षय अशा काळात स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. मनाचा मोठेपणा दाखवत त्याने पुन्हा एकदा काम केल्याने खूप चर्चेत आला आहे. मुंबई ते दिल्ली असा प्रवास करणार एक विमानात सर्वात कमी प्रवासी होते. त्यामध्ये अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया तिची मुले आणि केअर टेकर याचाही समावेश होता. त्यामुळे अक्षयने संपूर्ण विमानाचे बुकींग केले. या संपूर्ण विमानात केवळ 4 लोकांनी प्रवास केला.

Read More  पंतप्रधान मोदींनी देशाला लिहलेल्या पत्रातील १० महत्त्वाच्या गोष्टी

त्यामध्ये अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया तिची दोन मुले, केअर टेकर यांचा समावेश होता. या सर्वांना कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा दिली गेली नाही. कोविड 19 संबंधित उपचारांचे प्रोटोकॉल पाळत त्यांनी या विमानातून प्रवास केला. पण जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यावेळी अनेकांनी अक्षय कुमारला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात अनेक मजूरांना घरी जाण्यासाठी बस नाही ते पायी प्रवास करत आहेत आणि अक्षय कुमारने त्याच्या फॅमिलीसाठी पूर्ण विमान बुक केले हे अनेकांना पटलेले नाही. त्यामुळे अक्षयला ट्रोल केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या