मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना खुश केले होते. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची रांग लागली आहे, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
‘ब्रह्मास्त्र’व्यतिरिक्त आलिया ‘डार्लिंग्स’ नावाच्या आणखी एका चित्रपटात दिसणार असून त्याचा टीझरही आता रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच मजेशीर आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये सस्पेन्सने भरलेली अनेक दृश्ये आहेत.
या चित्रपटात आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती शाहरूख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस आणि आलियाचे प्रोडक्शन हाऊस इंटरनल सनशाईन यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.