मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलिया भट्टने काल मेट गाला इव्हेंट २०२३ मध्ये पदार्पण केले. या कार्यक्रमात अभिनेत्री पांढ-या रंगाचा गाऊन परिधान करून एंजेल लूकमध्ये पोहोचली होती.
दुसरीकडे, आलियाच्या मेट गाला लूकला सोशल मीडियावर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इंटरनेटवरील एक सेक्शन आलियाच्या मेट गाला लूकची दीपिका पदुकोणच्या कान्स लुकशी तुलना करत आहे.
आलिया भट्टने न्यूयॉर्कमधील मेट गाला इव्हेंटमध्ये तिच्या मेगा पदार्पणासाठी मौल्यवान मोत्यांनी जडलेला एक आकर्षक पांढरा गाऊन परिधान केला होता. आलियाचा मेट गाला लूक सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी ७५ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिकाचा पर्ल लूक पोस्ट करण्यास सुरुवात केली.
शालीना नाथानी यांनी स्टाईल केलेली, दीपिकाने कान्स येथील डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या वॉर्डरोबमधून पांढ-या मोत्याचा बस्टिअर आणि हाताने भरतकाम केलेला कॉलर परिधान केला होता.
दुसरीकडे, मेट गालामध्ये आलिया ही एकमेव बॉलिवूड दिवा नाही, तर प्रियांका चोप्रा देखील चौथ्यांदा मेट गालाच्या रेड कार्पेटवर परतली आहे. व्हरायटी पत्रकार मार्क माल्किन यांच्याशी बोलताना प्रियांकाने तिच्या उपस्थितीची पुष्टी केली होती.
या वर्षी मेट गालाची थीम कार्ल लेजरफेल्ड : ए लाईन ऑफ ब्युटी आहे, जे जर्मन फॅशन डिझायनरचा सन्मान करण्यासाठी आहे. ज्येष्ठ फॅशन डिझायनरचे २०१९ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.