19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमनोरंजनमाझा भारत महान म्हणत आलियाने जिंकली प्रेक्षकांची मने

माझा भारत महान म्हणत आलियाने जिंकली प्रेक्षकांची मने

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या जोरदार यशानंतर आलिया आता तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. गरोदरपणातही ती तिच्या आरोग्यासोबत कामावर लक्ष केंद्रित करत आहे.ती नेहमीच कुठे न कुठे ,अनेक कार्यक्रमात सक्रिय असते. नुकतंच आलियाने सिंगापूरमध्ये टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली. तिला टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

आलियाला टाईम अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने जोरदार भाषणही केले. भाषणात आलिया म्हणाली, ‘माझा भारत महान आहे. आपल्या कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना तिने सांगितले की भारत सर्वोत्तम आहे. भारतामुळे ती आज इथे आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबात माहिती देत फोटो शेअर केले आहेत. यानंतर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय.

आलिया भट्टला तिच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत असतात. आलियाचे ‘हायवे’ , ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ राझी’ आणि ‘डार्लिंग्स’ सारखे सर्वच चित्रपट हिट झालेत. तिने सर्वच चित्रपटात दमदार अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये तिने खास गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.यात ती तिचे बेबी बंपही फ्लॉन्ट दाखवत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या