27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनआलियाच्या ‘बेबी शॉवर’ची जोरदार तयारी

आलियाच्या ‘बेबी शॉवर’ची जोरदार तयारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसलेल्या रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून पाच दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

त्याचवेळी रणबीर आणि आलिया देखील लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत, ज्याबद्दल ते खूप उत्सुक आहेत. या सगळ्यामध्ये नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनी आलियाच्या बेबी शॉवरची तयारी सुरू केली आहे.

माध्यमाच्या वृत्तानुसार, आलिया भट्टची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर आलियासाठी काही खास प्लॅनिंग करत आहेत. दोघींनीही आलियाच्या बेबी शॉवरची तयारी सुरू केली आहे, ज्यामध्ये फक्त मुलीच असतील. बेबी शॉवर फक्त मुंबईतच होणार आहे. मात्र, बेबी शॉवर समारंभ लग्नाप्रमाणे घरी होणार की अन्य ठिकाणी होणार हे निश्चित झालेले नाही.

वृत्तानुसार, आलिया भट्टच्या बेबी शॉवरमध्ये फार कमी लोक सहभागी होणार आहेत. यामध्ये फक्त आलियाचे बालपणीचे मित्र आणि कुटुंबियांचा समावेश असेल. पाहुण्यांच्या यादीत आकांक्षा रंजन सिंग, शाहीन भट्ट, करीना कपूर, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर ती ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लव रंजनच्या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानासोबत ‘एनिमल’मध्ये दिसणार आहे. याशिवाय दोघांचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या