मुंबई :अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर प्रेग्नेसीची घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. याच दरम्यान तिने आता सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.
प्रेग्नेंट आलिया लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या ७ व्या सीझनमध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये ती याच ड्रेसमध्ये दिसली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
आलियाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्र ८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे, ज्यामध्ये ती प्रथमच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एवढेच नाही तर ब्रह्मास्त्रही पूर्ण रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच रिलीज झाला आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेह-यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. या फोटोशूटमध्ये आलियाने जो ड्रेस घातला आहे तो फारच टाइट आहे. त्यामूळे तिचा बोल्ड लूक उठून दिसत आहे. तसेच हा लूक पूर्ण करण्यासाठी आलिया भट्टने केस मोकळे सोडले आहेत आणि लाईट मेकअप केला आहे.