22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनआलियाचे दोन चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

आलियाचे दोन चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भट्ट स्टारर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत समाविष्ट झाला आहे. तर आलियाचा दुसरा चित्रपट ‘आरआरआर’ला ऑस्कर नामांकन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रत्येक चित्रपटाने सिनेसृष्टीत एक नवे रेकॉर्ड केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा ‘देवदास’ हा चित्रपट ऑस्कर नामांकनामध्ये अगदी जवळ पोहोचला होता.

या चित्रपटात ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आणि शाहरूख खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. परंतु हा चित्रपट ऑस्कर सोहळ्यापर्यंत पोहोचू शकला नाही.
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टने एका सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते.

अगदी कमी वयात आलिया भट्टने विविध दमदार भूमिका साकारत सर्वांनाच थक्क केले आहे. या चित्रपटाला देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा अफाट प्रेम मिळाले होते. त्यामुळेच या चित्रपटाची ऑस्कर नामांकनासाठी निवड होण्याची सर्वांत जास्त शक्यता आहे. सोबतच ‘आरआरआर’ हा सुपरडुपर हिट चित्रपटसुद्धा ऑस्करच्या शर्यतीत आहे.

या चित्रपटातसुद्धा आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. त्यामुळे आलिया भट्टचा कोणता चित्रपट ऑस्करसाठी नामांकित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पती रणबीरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या