34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरून याबाबत माहिती दिली आहे. मात्र त्यांना काय त्रास होतोय याबाबत अद्याप काहीही समजलेले नाही.

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री एक ब्लॉग लिहिला असून त्यात फक्त एका ओळीत त्यांनी शस्त्रक्रियेबाबत सांगितले आहे. ‘मेडिकल कंडिशन.सर्जरी. मी लिहू शकत नाही’ असे अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. त्यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अनेकांनी कसली शस्त्रक्रिया, काय झाले आहे असे प्रश्न विचारले आहेत.

शनिवारी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करत त्यात कवितेच्या दोन ओळी लिहिल्या होत्या. ‘कुछ जरूरत से ज्यादा बढ़ गया है; कुछ काटने पर सुधरने वाला है; जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे’ असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांचे हे ट्विट त्यांच्या शस्त्रक्रियेशी जोडले जात आहे.

मोहोळ तालुक्यातील वाळू माफियांना दणका

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या