24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home मनोरंजन अमिताभ यांना रुग्णालयातून सुटी

अमिताभ यांना रुग्णालयातून सुटी

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तब्बल २३ दिवसांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा करोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली. बिग बींचा कोरोना रिपोर्ट ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे

खुद्द अमिताभ यांनी याबदल ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली असली तरी अभिषेक बच्चन मात्र अद्याप कोरोना पाॅझिटिव्हच आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मी घरीच विलगीकरणात राहणार आहे. सर्वशक्तिमान देवाची कृपा. आई, बाबूजींचे आशीर्वाद, हितचिंतक आणि मित्रांचे आशीर्वाद आणि प्रार्थना तसेच नानावटी रुग्णालयात माझी उत्कृष्ट काळजी घेतल्यामुळे मला हा दिवस पाहणे शक्य झाले. ‘

Read More  कोरोनाची लागन : महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या