26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनअमिताभने केले ‘गुड बाय’चे पोस्टर शेअर

अमिताभने केले ‘गुड बाय’चे पोस्टर शेअर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन आणखीन एक धमाका करण्यासाठी तयार आहेत. नुकताच त्यांचा आगामी चित्रपट ‘गुड बाय’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसत आहे. हे पोस्टर बघितल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी स्वत: ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसते आहे. अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले.

अमिताभ बच्चन यांनी ‘गुड बाय’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, कुटुंब ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, कोणी जवळ नसतानाही त्यांची भावना कायम राहते. यासोबतच त्यांनी हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या