21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजनअमृता फडणवीस यांचे ‘वो तेरे प्यार का गम’

अमृता फडणवीस यांचे ‘वो तेरे प्यार का गम’

एकमत ऑनलाईन

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा त्यांच्या गाण्यांचे अल्बम, त्या कायमच लाईमलाईटमध्ये असतात. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. आता अमृता फडणवीस एक नवीन गाणं घेऊन आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांचीच चर्चा सुरू आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. वो तेरे प्यार का गम असे या गाण्याचे बोल आहेत. हे पोस्टर शेअर करताना अमृता फडणवीस यांनी एक ट्वीटही केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना.

लफ्ÞजÞ नए है, पर रंग वही सुहाना! थँक यू सारेगामा ग्लोबल, कमिंग अप!
याआधीही अमृता फडणवीस यांच्या गाण्यांचे अनेक अल्बम्स प्रदर्शित झाले आहेत. शिवतांडव नृत्य, तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक, ये नयन डरे डरे, तेरी मेरी फिरसे, मोरया रे, बेटिया प्राईड ऑफ नेशन, सड्डी गल्ली रेल गड्डी, कुणी म्हणाले, अंधार, तिला जगूद्या, पेटूनी उठू दे आज एक अशी अनेक गाणी अमृता फडणवीस यांनी याआधी गायली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या