मुंबई : सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीकचा माहोल बघायला मिळत आहे. अशात ८० आणि ९० च्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्नाअगोदर अमृता सिंग क्रिकेटर रवि शास्त्री यांना डेट करत होती. मात्र रवि शास्त्रींच्या एका अटीमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला.
अभिनेत्री अमृता सिंगचा जन्म ९ फेब्रुवारी १९५८ मध्ये झाला. अमृताने १९८३ मध्ये ‘बेताब’ सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती.
अमृताचे पहिले अफेअर क्रिकेटर रवि शास्त्रीसोबत होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली होती. एक वेळ अशी आली होती की, दोघांनी त्यांच्या नात्याला नाव देण्याचा विचारही केला होता. रवि आणि अमृता दोघांनाही लग्न करायचे होते. पण असे म्हणतात की, रविने लग्नाआधी अमृतासमोर एक अट ठेवली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, रविची इच्छा होती की, अमृताने लग्नानंतर सिनेमात काम करू नये. हे अमृताला आवडलं नाही. कारण तेव्हा ती यशस्वी करिअरच्या शिखरावर होती. यावर खूप चर्चा झाली. पण काही सोल्युशन निघाले नाही. अमृताने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर ती टेन्शनमध्ये राहत होती. पण नंतर तिने स्वत:ला कामात बिझी करून घेतले. पहिल्या ब्रेकअपनंतर अमृताच्या जीवनात सैफ अली खानची एन्ट्री झाली. पण लग्नानंतर दोघेही एकमेकांपासून दूर गेले. २ मुलांच्या जन्मानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्न केले. अमृता मुलांसोबत आता एकटी राहते.
‘बेखुदी’ सिनेमादरम्यान ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली होती. सैफ तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान होता.