23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजन‘अंगुरी भाभी’ला झाली दुखापत

‘अंगुरी भाभी’ला झाली दुखापत

एकमत ऑनलाईन

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. परंतु सध्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री असलेली अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेला दुखापत झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
या बातमीने मालिकेचे चाहते चांगलेच चिंतेत सापडले आहेत. ‘भाभीजी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे.

मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका इतक्या अप्रतिमरीत्या साकारली आहे की घराघरांत त्यांना लोकप्रियता मिळाली आहे. याच मालिकेतील सर्वांत लोकप्रिय भूमिका म्हणजेच अंगुरी भाभी. आपल्या साध्या सरळ अभिनयाने आणि अडाणी व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्याने ही व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरत आहे. मात्र सध्या ही अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री शुभांगी अत्रेला तिच्या घरातील हायड्रोलिक बेड उचलताना ही गंभीर दुखापत झाली आहे. यावर तात्काळ उपचार केल्यानंतर अभिनेत्रीला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणतीही जड वस्तू उचलण्यासही डॉक्टरांनी अभिनेत्रीला सक्त मनाई केली आहे. शुभांगीच्या या गंभीर दुखापतीमुळे तिचे चाहते चांगलेच काळजीत पडले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या