मुंबई : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर आहे. ऋषभवर डेहरडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. ‘ऋषभसाठी लोकांनी प्रार्थना करावी.’ असे आवाहन अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी केले.
अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी ऋषभ आणि त्याच्या आईची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले, ‘आम्ही ऋषभला आणि त्याच्या आईला भेटलो. त्याची प्रकृती स्थिर आहे. तो लवकर बरा व्हावा, यासाठी लोकांनी प्रार्थना करावी असे आवाहन आम्ही करतो.’
दिल्लीहून परतताना उत्तराखंडमध्ये हम्मदपूरजवळ पंतचा अपघात झाला. ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पंतच्या चेह-यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.