22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमनोरंजनअंकिता लोखंडे गोड बातमी देणार? राखी सावंतने दिल्या शुभेच्छा

अंकिता लोखंडे गोड बातमी देणार? राखी सावंतने दिल्या शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीव्ही अ‍ॅक्ट्रेस अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे काही महिन्यांपूर्वी थाटामाटात लग्न पार पडले. दोघांच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. यावेळी सेलिब्रेशनचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे मात्र सोशल मीडियावर अंकिताच्या प्रेग्नेंसी चर्चांना उधाण आले आहे.

त्यात भर म्हणजे अंकिताची जवळची मैत्रीण राखी सावंतने अंकिताला दिलेल्या शुभेच्छांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे अंकिताच्या आई होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या जोडप्याने जरी प्रेग्नेंसीबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी अनेक रिपोर्टमधून अंकिता प्रेग्नेंट असण्याचा दावा करण्यात आला आहे

. माध्यमांशी बोलताना राखीला अंकिताच्या प्रेग्नेंसीबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘अंकिता लवकरच एक गोड बातमी देण्याची शक्यता आहे.’ राखी सावंतने यावेळी ‘अंकिता आय लव्ह यू’ म्हणत आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे ‘देव मला ही संधी कधी देणार’, म्हणत आई होण्याची स्वेच्छाही व्यक्त केली आहे. अलीकडे अंकिताच्या सैल कपड्यांवरून ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज बांधला जात होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या