17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home मनोरंजन बच्चन कुटुंबाच्या घरात आणखी एका कारची एंट्री

बच्चन कुटुंबाच्या घरात आणखी एका कारची एंट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई, 01 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसवर मात करून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. केबीसी 12 चं शूटिंग त्यांनी सुरू केलं आहे. यादरम्यान बच्चन कुटुंबाच्या घरात आणखी एका कारची एंट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बी यांनी S Class मर्सिडीज खरेदी केली आहे.

S Class मर्सिडीज ही कर आजच भारतात लाँच झाली आहे. कोट्यवधी रुपयांची ही कार आहे. इंटरनेटवरील माहितीनुसार या कारची किंमत जवळपास एक कोटी 38 लाख रुपये आहे. या कारचं रजिस्ट्रेशन अमिताभ बच्चन यांच्या नावाने आहे. विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचे फोटो टाकण्यात आले आहेत.बच्चन कुटुंबाकडे अनेक कार आहेत. रोल्स रॉयजसारख्या कारचे मालक अमिताभ बच्चन यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या कारचा नंबरही खास आहे. अमिताभ यांच्या या नव्या कारचा नंबर MH02FJ4041 आहे. यातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण 11 होते. अमिताभ हा आकडा आपल्यासाठी लकी मानतात. तसंच 11 ऑक्टोबर ही त्यांची जन्म तारीख आहे.

अमिताभ बच्चन सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा शो कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रविवारी त्यांनी या शोचा धमाकेदार प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोत अमिताभ आपल्या शोच्या पहिल्या एपिसोडमधील स्पर्धकासह दिसत आहेत.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही उपचारादरम्यान अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवला होता. केबीसीचं शूटिंग सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा फोटो शेअर केला होता. कोरोनाप्रतिबंधक सर्व खबरदारी घेऊनच चित्रिकरण पार पडलं. या सगळ्यामुळे सेटवरील वातावरण खूप बदलल्याचं पाहायला मिळत होतं.मास्कमुळे लोक ओळखूही येत नाही. वातावरणात सतत एकप्रकारची भीती असते. कोरोनामुळे सेटवर निळ्या रंगाचा जणू समुद्रच असतो.

सगळे शांत, एकदम सतर्क आणि सतत खबरदारी, मास्क, निर्जंतुकीकरण आणि भीतीखाली. यंदा सगळंच वेगळं वाटतं आहे. आधीसारखं हसतखेळत काम होत नाही. कामाशिवाय कुणी बोलत नाही. असं वाटतं कोणत्यातरी प्रयोगशाळेत शांतपणे रासायनिक प्रयोग सुरू आहेत. चेहरे ओळखता येत नाहीत. कधीकधी तर भीती वाटते की आपण त्याच लोकांसोबत आहोत का? पण धैर्य दाखवून पुढे जावं लागतं, असं म्हणत अमिताभ यांनी कोरोना काळातील सेटवरील आपला अनुभव मांडला होता.

वाढीव विद्युत बिलामुळे मनसेचा महावितरण कार्यालयात राडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या