22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमनोरंजनअभिनेता गोविंदाच्या कारला मागून धडकली दुसरी कार

अभिनेता गोविंदाच्या कारला मागून धडकली दुसरी कार

एकमत ऑनलाईन

मुंबई, 24 जून : अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात झाला आहे. गोविंदाच्या कारला मागून दुसरी कार धडकली आहे. ही दुसरी कार यशराजची असल्याचं सांगितलं जातं आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान जुहूमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाची कार पुढे होती आणि मागून यशराजची कार होती. यशराजच्या कारने गोविंदाच्या कारला धडक दिली. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता. मात्र त्याचा मुलगा यशवर्धन गाडीत होता आणि कार ड्रायव्हर चालवत होता. अचानक या कारला यशराजची कार मागून येऊन धडकली. ही कार ड्रायव्हर चालवत होता.

दरम्यान या कार अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही आहे. कारचं थोडं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं आहे. अपघातानंतर दोन्ही पक्षांनी हा वाद आपसात मिटवला आहे. अपघातप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

Read More  कोविफोर औषधाची एक बाटलीची किंमत ५ हजार ४०० रुपये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या