17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमनोरंजनतेलंगणात सोनू सूदचे आणखी एक मंदिर

तेलंगणात सोनू सूदचे आणखी एक मंदिर

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : विविध अभिनेत्यांची मंदिरे बांधल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. चाहते काय करतील, याचा नेम नसतो. असाच एक प्रकार तेलंगाणा राज्याच्या खम्माम या ठिकाणी पाहायला मिळाला. तेलंगाणामध्ये सोनू सूदसाठी त्याच्या चाहत्यांनी आणखी एक मंदिर बांधले आहे. कोरोनाच्या काळात सोनूने अनेक लोकांना मदत केली. त्यामुळे आमच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की आम्ही सोनू सूद सरांचे चाहते बनलो आणि त्यांचे मंदिर बांधले, असे व्येंकटेश म्हणाला.

गेल्या वर्षीही असाच एक प्रकार समोर आला होता. तेलंगाणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील दुब्बा तांडा गावात सोनूसाठी एक मंदिर बांधण्यात आले होते. कोविड -१९ महामारी दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांसाठी मदत पोहोचवल्याने सोनू सूदच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. याआधी आपण दाक्षिणात्य अभिनेत्यांची मंदिरे बांधल्याचे पाहिले आहे. त्यातच आता सोनू सूदच्या मंदिराची भर पडली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या