29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजनमलायकासोबत ब्रेकअप अर्जुनकपूरने नाकारला

मलायकासोबत ब्रेकअप अर्जुनकपूरने नाकारला

एकमत ऑनलाईन

मुंबई : अर्जुन कपूरआणि मलायका कपूर हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात, एकत्र सुट्ट्यांवर जातात. बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कायम एकत्र असणारे हे कपल गेल्या आठ दिवसांपासून एकदाही एकत्र दिसले नाही. इतकेच नाही तर मलायका देखील घराबाहेर पडलेली नाही. त्यामुळे या दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चिली जाऊ लागली. मात्र आमच्यात सारे काही आलबेल आहे. आमच्या नात्यामध्ये अफवांना अजिबात स्थान नाही, असे सांगत अर्जुन कपूरने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शेअर केली खास पोस्ट
दिवसभर अर्जनु आणि मलायकाच्या ब्रेकअपवर चर्चा होत होती. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे तर्क, अंदाज वर्तवत होते. हे सर्व सुरू असताना अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना त्याने मलायकाचा आणि त्याचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने लिहिले आहे की, ‘आणि आमच्या नात्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना स्थान नाही. सुरक्षित रहा, काळजी घ्या. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो…आणि तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम…’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या