27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनमलायकाच्या आधी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर

मलायकाच्या आधी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वांत चर्चित कपल्सपैकी एक म्हणून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराला ओळखले जाते. ते सतत एकत्र सुटीचा आनंद घेताना दिसून येतात. परंतु मलायकासोबत नात्यात येण्याआधी अर्जुन कपूरने बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहिणीला डेट केले आहे.

अर्जुन कपूर एकेकाळी अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांमध्ये फार छान बॉन्डिंग होते. तब्बल दोन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर अचानक या दोघांचा ब्रेकअप झाला होता. असे म्हटले जाते की, मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरची जवळीकता वाढत होती, त्यामुळे खान कुटुंबाने अर्जुनला तिच्यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता.

परंतु अर्जुनने ते फारसे मनावर घेतले नव्हते. दरम्यान अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या नात्यातसुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही दिवसांनंतर मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोटदेखील झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुनने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

या दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ब-याचवेळा ट्रोलदेखील केले जाते. परंतु या दोघांना त्याचा अजिबात फरक पडत नाही. मलायका आणि अर्जुन सतत सोशल मीडियावरून आपले प्रेम व्यक्त करत असतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या