24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनअरुण गोवील, दीपिका चिखलिया पुन्हा राम-सीतेच्या भूमिकेत

अरुण गोवील, दीपिका चिखलिया पुन्हा राम-सीतेच्या भूमिकेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत भगवान राम आणि सीतेची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोवील आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे दिल्लीच्या रामलीलामध्ये अभिनय करताना दिसणार आहेत. कडकड्डूमा येथील रामलीलामध्ये हे दोन्ही कलाकार भगवान राम आणि सीतेची भूमिका साकारणार आहेत.

कडकड्डूमा येथील सीबीडी मैदानावर लीला आयोजित करणारे श्री हनुमंत धार्मिक रामलीला समितीचे सरचिटणीस ललित गोयल यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी धनुष्य तोडण्यापासून सीता स्वयंवर भागाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात दोन्ही कलाकार अरुण गोवील आणि दीपिका चिखलिया अभिनय करताना दिसणार आहेत. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, लाल किल्ल्यातील तीन मजली रंगमंचाच्या माधवदास पार्कमध्ये श्री धार्मिक लीला समितीच्या वतीने रामायण या मालिकेवर लीला रंगणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. रामलीला मचाणासाठी तीन मजली स्टेज तयार करण्यात येत आहे. रामलीला समिती यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे.

‘पंडालमध्ये प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहेत. शताब्दीद्वार, वाल्मीकीद्वार, तुलसीद्वार आणि रामद्वार अशी त्यांची नावे आहेत’ असे समितीचे सरचिटणीस धीरजधर गुप्ता आणि मंत्री प्रदीप शरण यांनी सांगितले.

‘रामायण’ या मालिकेची झलक पाहायला मिळणार आहे. रावण जेव्हा लक्ष्मणरेषा ओलांडतो तेव्हा अग्नी प्रज्ज्वलित केला जाईल. रावण-जटायू, राम-रावण, लक्ष्मण-मेघनाथ यांच्यात युद्ध होईल. हनुमानाने लंका जाळण्याबरोबरच लक्ष्मण जखमी झाल्यास संजीवनी बुटीही आणली जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या