17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमनोरंजनरावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन

रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : रामायण या लोकप्रिय मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचा मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्यानं निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद त्रिवेदी हा मागील काही दिवसापासून आजारी होते बऱ्याच काळापासून ते अनेक प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते.

अरविंद त्रिवेदी यांना दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं. साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबई येथील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या