28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन आशा भोसले यांचे इंस्टा अकाऊंट हॅक

आशा भोसले यांचे इंस्टा अकाऊंट हॅक

एकमत ऑनलाईन

मुंबई : गायिका आशा भोसले यांचे इंस्टा अकाऊंट सोमवारी हॅक झाले असून, अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच काही तासांतच ते रिकव्हर करण्यात यश आले. पण त्यावरच्या सगळ्या पोस्ट डिलीट कराव्या लागल्या.

हॅकर्सच्या वाढलेल्या कारवायांमुळे सोशल मीडिया वापरतानाचा धोका वाढल्याची जाणीव झाली आहे. फक्त सेलेब्रिटींची अकाउंट्स नव्हे तर सामान्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सनासुद्धा हॅकर्सपासून धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने एक अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने सांगितले आहे़ तुमच्या इन्स्टा अकाउंटचे युजरनेम आणि पासवर्ड अजिबात कुणाशी शेअर करू नका. हॅक करणारे गुन्हेगार माहितीचा उपयोग व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचेही सायबर सेल पोलिसांनी सांगितले आहे.

हलाल शब्दाला हटविले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या