31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमनोरंजनआसिफ बसरा यांची आत्महत्या

आसिफ बसरा यांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

धर्मशाळा : मनोरंजन विश्­वासाठी यंदाचे वर्ष सर्वाधिक धक्कादायक असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याने बॉलीवूडला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा ५ वर्षांपासून हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे युकेमधील एका मैत्रिणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्याच दोरीने त्यांनी गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. गेल्या काही काळापासून ते नैराश्­याचा सामना करत होते.

याप्रकरणी पोलिस सखोल चौकशी करत आहेत, अशी माहिती कांगडाचे एसपी विमुक्­त रंजन यांनी दिली. आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. परजानियां आणि ब्लॅक फ्रायडे याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा आउटसोर्समध्ये देखील काम केले होते.

हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या सिनेमात त्यांनी अभिनेता इम्रान हाश्­मीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तसेच आशिकी-२, काय पो चेसह काही वेब सिरीजमध्येही त्यांनी निर्णायक भूमिका साकारल्या होत्या.

लवकरच भारत करणार क्षेपणास्त्र निर्यातीस प्रारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या