मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ वादात सापडला आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली असून, बेशरम रंग गाणे हटवा नाही तर आंदोलन छेडू असा चित्रपटावरून इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
दरम्यान रामदास आठवले यांनी चित्रपटावर होणा-या वादाविषयी बोलताना म्हणाले, पठाण चित्रपटाला आमचा विरोध नाही. पण चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाचा पेहराव केला असून, गाण्याचे बोल बेशरम रंग असे आहेत. भगवा रंग हा भाजप, शिवसेनेचा तसंच तो गौतम बुद्धांच्या पेहरावातला हा रंग आहे.
तो रंग शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे या चित्रपटातून हा भाग वगळला पाहिजे, असे न झाल्यास आम्हीपण आंदोलन छेडू, कोणताच रंग बेशरम नसतो, त्यामुळे तो रंग चित्रपटातून हटवायला हवा असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.