27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजनजितेंद्र जोशीला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

जितेंद्र जोशीला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : मराठी सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बाब आहे. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर गोदावरी सिनेमाची आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या ओपन्ािंग फिल्ममध्ये निवड करण्यात आली होती. आता या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशीला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित गोदावरी सिनेमाने जगभरातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपले नाव कमावले आहे. अशातच आता जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याने ‘गोदावरी’च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनेक पुरस्कार सोहळ्यात ‘गोदावरी’चा गौरव
गोदावरी सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘इफ्फी २०२१’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाची ओपन्ािंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअरही दाखवण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या