मुंबई : ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नही’ यांसारख्या चित्रपटांतून आपली ओळख असलेला अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी हे लोकप्रिय जोडप्यापैकी आहेत. दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना फार आवडते . सध्या ते त्यांच्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण घालवत आहेत. कारण लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत.
अपूर्वने सोशल मीडियावर एका क्यूट व्हीडीओद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडीओ शेअर केला आहे.
व्हीडीओमध्ये हे जोडप्याने आपल्या लहान बाळाला धरलेले आहे. ते दोघेही तिच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. पांढ-या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांची छोटी परी खूपच क्यूट दिसत आहे. शिल्पाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय तर, अपूर्व कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या जोडप्याचा फॅमिली व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
व्हीडीओ शेअर करताना अपूर्वने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘‘तर अशा प्रकारे माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत खास वाढदिवस बनला, कारण देवाने आम्हाला आतापर्यंतची सर्वांत खास, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारी भेट दिली आहे. आनंदाने शिल्पा आणि मी आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देतो. तिच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.’’