37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमनोरंजनकंगनाला जामीनपात्र वॉरंट जारी; जावेद अख्तर प्रकरण

कंगनाला जामीनपात्र वॉरंट जारी; जावेद अख्तर प्रकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरोधात अंधेरी कोर्टाने यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अंधेरी कोर्टाने कंगना रनौत हिच्याविरूद्ध वॉरंट जारी केल्यानंतर कोर्टात हजर असलेल्या कंगनाच्या वकिलाने वरच्या कोर्टात या वॉरंटला आव्हान देणार असल्याचं सांगितलं असून पुढील सुनावणी २६ मार्चला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला नोटीस बजावली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे.

कंगनाने काय म्हटले ?
अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गँग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा आरोप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला होता.

आता मिळणार २५० रूपयात कोरोना लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या