23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमनोरंजनभरत जाधवचा स्टेपनी चित्रपट आता घराघरात

भरत जाधवचा स्टेपनी चित्रपट आता घराघरात

एकमत ऑनलाईन

मुंबई : नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता भरत जाधव कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य करत असतो. कधी तो नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर बोलतो तर कधी वारीच्या रंगात तल्लीन होऊन जातो. भरतने आजवर अनेज चित्रपट केले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने आपल्याला भरभरून हसवल आहे. असाच त्याचा स्टेपनी हा चित्रपट आता आपल्याला घर बसल्या पाहता येणार आहे.

धुळ्यातील तुषार भटुलाल जयस्वाल दिग्दर्शित केलेला स्टेपनी या सिनेमात भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहे. यासह विजू खोटे, आदिती भागवत, स्वाती चिटणीस, अमिता खोपकर, किशोर नांदलासकर अशा दिग्गज कलावंतांनी या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तर तुषार जयस्वाल यांनीही या सिनेमात मध्यवर्ती भूमिका निभावली आहे. चित्रपटाची निर्मिती भटुलाल जयस्वाल यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या