मुंबई : कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांसमोरही जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोघांनीही जामीनासाठी अर्ज केलेला आहे. दोघांच्याही जामीन अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी केली जाणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर केले असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक केली होती.
कोरोनामुळे २० लाख मुलांचा मृत्यूची शक्यता