23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजनपैशासाठी भारतीला पसरावे लागले होते हात

पैशासाठी भारतीला पसरावे लागले होते हात

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉमेडी विश्वात स्पर्धक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी कॉमेडियन भारती सिंग
आज ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून ओळखली जाते. ३ जुलै १९९७ रोजी जन्मलेली भारती सिंग लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. आईने एकट्याने भारती आणि तिच्या दोन भावंडांचे संगोपन केले.

भारती तिच्या संघर्षाबद्दल अनेकदा बोलली आहे. एकदा तिला तिच्या आयुष्यातील तो टप्पा आठवला, जेव्हा तिला पैशासाठी अभिनेत्यासमोर हात पसरावे लागले.

कॉमेडीच्या दुनियेवर राज्य करणा-या भारती सिंगकडे पैशांची कमतरता नाही, पण एक काळ असा होता जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत होती. तिला तिच्या घराचे डाऊन पेमेंट भरायचे होते, पण तिच्याकडे पैसे नव्हते, त्यानंतर तिने अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलकडून १० लाख रुपये उसने घेतले.

भारती सिंहने मनीषकडे १० लाख रुपये मागितले होते आणि ती नंतर परत करेल या अटीवर त्याने तिला पैसे दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या