मुंबई : कलाविश्वात आज बरेचसे विनोदवीर आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये महिला विनोदवीरांची संख्या फार मोजकी आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे भारती सिंह. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर भारती सगळ्या विनोदवीरांना पुरून उरली आहे.
त्यामुळेच आज ती प्रसिद्ध लाफ्टरक्वीन म्हणून ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून त्याचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली होती. या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. इतकंच नाही तर भारतीदेखील सोशल मीडियावर या बाळासंदर्भातील पोस्ट शेअर करायची. मात्र, त्याचा चेहरा तिने रिव्हिल केला नव्हता. अखेर ब-याच महिन्यांनंतर तिने बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.