25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमनोरंजनबिग बींच्या बिग बजेट सिनेमाची घोषणा

बिग बींच्या बिग बजेट सिनेमाची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे बऱ्याच दिवसात कोणताही बिग बजेट सिनेमा थिएटरमध्ये रीलिज झाला नाही. पण लॉकडाऊनमुळे थंड झालेला सिनेमासृष्टीचा कारभार पुन्हा एकदा वेगाने सुरू झाला आहे. येत्या काळात अनेक मोठमोठे कलाकार आपल्याला पडद्यावर दिसणार आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चनही आपल्या नव्या सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमामध्ये ते अजय देवगणसोबत झळकणार आहेत.

अमिताभ बच्चन अजय देवगण एकत्र
अजय देवगण आणि अमिताभ बच्चन एका नव्या सिनेमामध्ये एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये पायलटची भूमिकाही करणार आहे. डिसेंबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘मेडे’ असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. अजय देवगण या सिनेमामुळे प्रचंड खूश आहे. कारण तो पहिल्यांदाच खुद्द अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. भुज द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमाच्या कामामध्ये सध्या अजय देवगण व्यस्त आहे. त्या सिनेमाचं काम पूर्ण करुन तो मेडे सिनेमाच्या कामाला सुरुवात करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अजय देवगण आणि अमिताभ बच्चन तब्बल ७ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या