24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमनोरंजनमोठा निर्णय : रितेश आणि जेनेलिया देशमुख करणार अवयवदान

मोठा निर्णय : रितेश आणि जेनेलिया देशमुख करणार अवयवदान

एकमत ऑनलाईन

मुंबई  : आज डॉक्टर दिन . या दिनानिमित्त अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख या दोघांनीही मोठा निर्णय घेतला आहे. रितेश आणि जेनेलिया दोघंही अवयवदान करणार आहेत. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत त्यांनी हा महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.

डॉक्टर दिनाचं औचित्य साधत अवयव दान करण्याचा निर्णय

जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दोघांनीही आपल्या या निर्णयाबाबत सांगितलं आहे. दोघांनीही आपले अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. या पोस्टमध्ये जेनेलियाने म्हटलं आहे, “रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. मात्र आज डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत”

जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते

“हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते, असं दोघंही म्हणालेत. शिवाय “तुम्हीदेखील पुढाकार घ्या आणि आयुष्य वाचवण्यासाछी प्रतिज्ञा करा, तुमचे अवयवदान करण्याची शपथ घ्या”, असं आवाहनही दोघांनी केलं आहे.

अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळते

एखाद्या रुग्णाच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यानंतर त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपित करता येतात. यासाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान करणं गरजेचं आहे. किडनी, यकृत असे काही अवयव जिवंतपणी दान करता येतात. तर शरीरातील इतर अवयव एखादी व्यक्ती ब्रेनडेड होते तेव्हा दान करता येतात. अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळते, त्यामुळेच अवयवदान म्हणजे जीवनदानच आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या