25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeमनोरंजनबिग बॉस फेम अभिनेत्री अपघातात गंभीर जखमी

बिग बॉस फेम अभिनेत्री अपघातात गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

चेन्नई : तामिळ बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री यशिका आनंद ही एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तर तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. अपघात स्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात एक कार ईसीआर रोडवरून जात होती. या कारने सेंटर मीडियनला जोरात धडक दिली आणि ही कार एका खड्ड्यात जाऊन पडली. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी अपघातग्रस्त कारकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अपघातग्रस्त कारमधून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. ज्यामध्ये यशिका आनंद हिचाही समावेश होता. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशिका हिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी ही अपघातग्रस्त कारमध्ये अडकली होती. तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र गंभीर जखमा झाल्याने तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

२४ तासांत ३९,७४२ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या