मुंबई : अभिनेत्री बिपाशा-आलिया दोघीही एका-एका मुलीची आई झाल्या आहेत. आलियाने तिची मुलगी ‘राहा’ची झलक दाखवल्यानंतर आता बिपाशानेही तिची मुलगी ‘देवी’ची झलक दाखवली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मुलीची झलक दाखवली आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी आणि पती करण सिंह ग्रोव्हरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
मुलगी आणि पती करण सिंह ग्रोव्हरसोबतचा बिपाशाचा हा फोटो चाहत्यांची मने जिंकत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये करण सिंह ग्रोव्हरने मुलीला हातात घेतले आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षांनंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. त्यांनी मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिचे नाव घोषित केले.
बिपाशा आणि करणने त्यांच्या लेकीचे नाव ‘देवी’ ठेवले आहे. सध्या करण आणि बिपाशा दोघेही आई-वडील झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. दरम्यान, बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हरची ‘अलोन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेट झाली होती आणि २०१५ मध्ये एक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं.