23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनबॉलिवूड कलाकारांचा पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव!

बॉलिवूड कलाकारांचा पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव!

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर) आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी जगभरातून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेते परेश रावल ते अभिनेत्री कंगना राणावत या कलाकारांच्या यादीत सामील आहेत.

  • वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. अभिनेते परेश रावल यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, ‘तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’

अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! घेतलेली शपथ आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात! वर्षानुवर्षे करत राहाल! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’

अभिनेता अक्षय कुमार याने देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुमची दृष्टी, तुमची कळकळ आणि तुमची काम करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारी वर्षं तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि आनंदी जावो हीच सदिच्छा.’

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या किरण खेर यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भारताला नवीन उंचीवर नेण्यासाठी मोठी ऊर्जा देवो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे सर. जय हिंद.’

अभिनेता रितेश देशमुख याने देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, ‘आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’

‘पंगा’ क्वीन बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे’, असे तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे.

अभिनेता अजय देवगण याने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजयने लिहिले की, ‘माननीय नरेंद्र मोदीजी, तुमचे नेतृत्व मला प्रेरणा देते. येत्या वर्षांत तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना!’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या