27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजन एकीकडे ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ तर दुसरीकडे ‘वी लव्ह आलिया भट्ट’

 एकीकडे ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ तर दुसरीकडे ‘वी लव्ह आलिया भट्ट’

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बायकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ‘लाल सिंह चड्ढा ’आणि ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते. तसेच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. सध्या ‘वी लव्ह आलिया भट्ट’ आणि ‘बॉयकॉय ब्रह्मास्त्र’ हे दोन हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर ‘वी लव्ह आलिया भट्ट’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ‘आलियाने गंगूबाई काठियावाडी’या चित्रपटातील कामाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले, असे ट्विट शेअर करून एका नेटक-याने ‘वी लव्ह आलिया भट्ट’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. तर एका युझरने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये आलिया ही केसरिया हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हीडीओ शेअर करून युझरने ‘वी लव्ह आलिया भट्ट’ हा हॅशटॅग वापरला आहे.

त्यामुळे आलियाचे फॅन्स ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट बघतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या ट्रेंडचा चित्रपटाला फायदा होईल, असे नेटकरी म्हणत आहेत.

एका व्हीडीओमधील रणबीरचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘मला गोमांस खायला आवडते’, असे रणबीर या व्हीडीओमध्ये म्हणत आहे. त्यामुळे ‘आम्ही गोमांस खाणा-या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही’, ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाला बॉयकॉट करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. ‘वी लव्ह आलिया भट्ट’ हा हॅशटॅग ट्रेंड झाल्याचा या चित्रपटावर चांगला परिणाम होईल. कारण आलियाचे फॅन्स हा चित्रपट आवर्जून बघतील. पण ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ या ट्रेंडमुळे चित्रपटाला नुकसान होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या