31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home मनोरंजन अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

एकमत ऑनलाईन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल रॉय यांचे बंधू रुमर सेन यांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहुल रॉय यांची प्रकृती आता सुधरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबई आणण्यात आले. राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते.

हाती फक्त खबरदारी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या