23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजन...घरात घुसून मारले होते..; कंगनाने पुन्हा एकदा घेतला करणशी पंगा

…घरात घुसून मारले होते..; कंगनाने पुन्हा एकदा घेतला करणशी पंगा

एकमत ऑनलाईन

मुंबई : कंगना राणावत आणि करण जोहर यांचे जुने वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे. खरं तर आधी कंगना व करण यांच्यात सगळं काही सुरळीत होतं. पण कंगनाने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली आणि या शोनंतर सगळे बिघडले होते.

होय, कंगनाने करणच्याच शोमध्ये जाऊन त्यालाच ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. तो नेपोटिज्मला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून कंगना व करण यांच्यात ३६ चा आकडा आहे.

करणला डिवचण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. अशात करण ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन घेऊन येतोय म्हटल्यावर कंगना गप्प कशी बसणार?
करणचा ‘कॉफी विथ करण ७’ हा शो सुरू झाला आणि यानिमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा करणला डिवचले आहे. ‘घर में घुस कर मारा था न…,’ असे तिने म्हटले आहे.

कंगनाने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. ‘पापा जो (करण जोहर) आपल्या सर्व लोकप्रिय कॉफी एपिसोडला प्रमोट करतो आहे. कारण आज हा शो ओटीटीवर येत आहे. पापा जो गुड लक … पण माझ्या एपिसोडचे काय? ओह सॉरी… सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारले होते ना… माझा एपिसोड त्याचा सर्वाधिक लोकप्रिय एपिसोड होता आणि यानंतर तो टीव्हीवर बॅन झाला होता…, असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या