27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमनोरंजनचक्रवर्तीने शेअर केला सुशांतसोबतचा रोमँटिक फोटो

चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसोबतचा रोमँटिक फोटो

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. सुशांतच्­या मृत्­यूनंतर त्­याच्या चाहत्­यांमध्ये खळबळ उडाली होती. आजही त्­याच्­या आठवणी चाहत्­यांमध्ये ताज्­या आहेत. इतकंच नाही तर सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेही त्­याच्या स्­मृतीदिनी त्­याचे स्­मरण केले आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्­टाग्रामवर सुशांतसोबतचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. रियाच्या या पोस्­टवर चाहत्­यांकडून अनेक कमेंट येत आहेत.

सुशांत सिंग राजपूतसोबतचा तिचा फोटो शेअर करत रिया चक्रवर्तीने लिहिलं आहे की, ‘मला रोज तुझी आठवण येते.’ रियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लिहिले आहे की, आम्हीही त्­याला खूप मिस करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि रिया तू ही मजबूत राहा. अशा प्रकारे सर्व चाहते सुशांत सिंग राजपूतला मिस करत आहेत.
२९ वर्षीय रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ चित्रपटाचा भाग होती.

या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि अनु कपूर दिसले होते. रियाने तिच्या करिअरची सुरुवात ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून केली होती. रिया चक्रवर्तीने हिंदीशिवाय तुनेगा, तुनेगा या तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या