25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमनोरंजनएक व्यक्ती म्हणून खूप बदललो ; नागा चैतन्य

एक व्यक्ती म्हणून खूप बदललो ; नागा चैतन्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक्यू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सामंथापासून विभक्त झाल्यानंतर मी या काळात व्यक्ती म्हणून खूप बदललो आहे. आता मी कुटुंब आणि मित्रांशी जास्त सलग्न झालो आहे, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागा चैतन्यने केले आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर दिली होती. तेव्हापासून नागा चैतन्यची पत्नी सामंथासोबत विभक्त होण्यामागची अनेक कारणे समोर आली. त्याच्यावर अनेक आरोपही लावण्यात आले होते. आता नागा चैतन्यने सामंथापासून वेगळे होण्यावर आणि घटस्फोटावर मौन सोडले आहे.

नागा चैतन्यने सांगितले की, या काळात मी एक व्यक्ती म्हणून खूप बदललो आहे. पूर्वी मी इतका मोकळा नव्हतो, पण आता मी सुरुवात केली आहे. आता मी कुटुंब आणि मित्रांशी खूप संलग्न झालो आहे. मी स्वत: अशा नवीन व्यक्तीला पाहून खूप आनंदी होतो.

चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये बोल्ड भूमिका केल्याने नागा चैतन्य पत्नी सामंथा रुथवर नाराज असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. इतकेच नाही तर नागा चैतन्यचे वडील नागार्जुनही सुनेच्या या पावलामुळे संतापले आहेत. चित्रपटांमध्ये आयटम साँग केल्याबद्दल तो तिच्यावर खुश नाही. लग्नानंतरच सामंथाने अशा भूमिकांमध्ये यायचं ठरवलं होतं.

अलीकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये सामंथा आणि अक्षय कुमार पाहुणे म्हणून दिसले होते. जेव्हा करणने नागा चैतन्यला सामंथाचा नवरा म्हणून संबोधले तेव्हा ती गोष्ट अभिनेत्रीच्या गळ्यातून उतरली नाही. तिने लगेच करणला दुरुस्त केले आणि सांगितले की तो आता माझा एक्स पती आहे, पती नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या