नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे चित्रपटगृहांवर लादलेले निर्बंध आता हळू हळू संपत आहेत. लॉकडाऊननंतर चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
१ फेब्रुवारीपासून कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करून चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेसह सुरू करता येतील. चित्रपटांसाठी अधिकाधिक ऑनलाइन बुकिंगला प्रोत्साहन द्यावे. तसेच दोन्ही शोमध्ये थोडा वेळ ठेवावा, अशा सूचनाही जावडेकर यांनी दिल्या.
महावितरणच्या चुकीमूळे उत्पादन घटणार