22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home मनोरंजन सुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी

सुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज एक वेगळे वळण मिळत आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एक व्हिडीओ शेअर करत न्यायाची मागणी केली होती. आता सुशांतची बहिण श्वेता सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत श्वेता सिंह किर्तीने लिहिले की, मी सुशांत सिंह राजपूतची बहिण असून, या पुर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मी विनंती करते. आमचा भारताच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि कोणत्याही किंमतीवर आम्हाला न्याय मिळेल याची आशा आहे.

यासोबतच श्वेता सिंहने लिहिले की, डिअर सर, माझे मन सांगत आहे की तुम्ही सत्यासाठी आणि सत्यासोबत उभे आहात. आमचे एक साधे कुटुंब आहे. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता, तेव्हा त्याच्याकडे कोणीही गॉडफादर नव्हता आणि आता माझ्याकडेही नाही. मी विनंती करते या प्रकरणाकडे लक्ष द्यावे व कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड होणार नाही हे पाहावे. मी न्यायाची आशा करते. दरम्यान, सुशांतची बहिण वारंवार सोशल मीडिया पोस्टद्वारे न्यायाची मागणी करत आहे. आता या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस आणि ईडीकडून देखील केला जात आहे.

Read More  दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक
Read More  औरंगाबाद : आज सकाळी 69 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow