30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमनोरंजनकोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

कोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : सन २०१७ सालातील कोर्ट हा सिनेमा चांगलाच गाजला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या सिनेमातील वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन झाले आहे. कोर्ट या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. १० दिवसानंतर ते कोरोना संक्रमित झाले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वीरा साथीदार यांनी कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय केला. कोर्ट सिनेमासाठी दोनशे लोकांचे ऑडीशन घेण्यात आले होते़ मात्र त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी वीरा साथीदार यांना विचारण्यात आले आणि त्यांनी होकार दिला. यापूर्वी आंबेडकर चळवळीत वीरा साथीदार सामिल झाले होते. त्यामुळे चळवळ सोडून अभिनयात तुम्ही तग धरू शकणार नाही अशी टीका अनेकांनी त्यांच्यावर केली होती. मात्र हा सिनेमा लोकप्रिय ठरला.

या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले. एवढेच नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. बेस्ट फॉरेन फिल्म या श्रेणीत कोर्ट सिनेमाची निवड झाली होती. शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झाले. या सिनेमात नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती.

सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या