22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमनोरंजनथलायवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

थलायवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे या संदर्भातील घोषणा केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. आपल्या सिनेसृष्टीत आजवर शेकडो महान कलाकार होऊन गेले आहेत. परंतु त्यापैकी मोजक्याच कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात १९६९ साली करण्यात आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. गेल्या ५२ वर्षात या पुरस्काराच्या बक्षिसाचं स्वरुप अनेकदा बदलण्यात आलं आहे.

दादासाहेब फाळके कोण होते ?
दादासाहेबांना भारतीय सिनेसृष्टीचे जनक असं म्हणतात. ते एक उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. त्यांचं पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असं होतं. पण लोक त्यांना दादासाहेब याच नावानं ओळखतात. त्यांनी लाईफ ऑफ जिझस ख्रिस्त हा मूकपट पाहिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या जन्माची तयारी सुरु झाली. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यावरही असाच चित्रपट बनवायचा या ध्यासानं झपाटून गेलेल्या दादासाहेबांनी परदेशी जाऊन चित्रपटनिर्मितीचं तंत्र शिकून घेतलं. परत आल्यावर प्रयोग म्हणून ‘रोपट्याची वाढ’ हा लघुपटही बनवला. त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघून पुढे ‘राजा हरिश्चंद्र’ या संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला बोलपट त्यांनी तयार केला.

दक्षिणेत रजनीकांत यांना देवाचा दर्जा
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.

२५ व्या वर्षी सिनेकारकिर्दिला सुरुवात
रजनीकांत यांनी वयाच्या २५ व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘अपूर्वा रागनगाल’ हा होता. या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीविद्या हे देखील होते. मुख्य भूमिकेत ‘भैरवी’ हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.

ब्राझीलचा ‘कोव्हॅक्सिन’ लस घेण्यास नकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या