30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमनोरंजनडान्स दीवाने ३ चा धर्मेश कोरोनाबाधित; १८ क्रू-मेंबर आणि जज पॉझिटिव्ह

डान्स दीवाने ३ चा धर्मेश कोरोनाबाधित; १८ क्रू-मेंबर आणि जज पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिअ‍ॅलिटी टीव्ही शो डान्स दीवाने ३ च्या सेटवर कोरोनाचा कहर दिसत असून स्पर्धकांनंतर आता सेटवरील १८ क्रू मेंबर्स आणि जज धर्मेश येलांदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शो मधील दुसरे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धर्मेश गोव्यातील आपल्या घरी क्वारंटाईन आहे. डान्स दीवाने ३ चे प्रोड्युसर अरविंद राव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच शोमध्ये धर्मेशच्या जागी पुढील काही दिवस कोरिओग्राफर शक्ती मोहन आणि पुनित जे. पाठक हे जज म्हणून दिसणार आहेत, असेही अरविंद राव यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना अरविंद राव यांनी सांगितले की, धर्मेशची गेल्या आठवड्यामध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. यानंतर तो गोव्यातील आपल्या घराची डागडुजी करण्याच्या कामासाठी गेला होता. ५ एप्रिलला तो चित्रीकरणासाठी येणार होता. चित्रीकरणापूर्वी सर्वांची कोरोना चाचणी करणे आवश्यक होते . धर्मेशनेही गोव्यामध्ये कोरोना चाचणी केली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, असेही अरविंद राव यांनी सांगितले.

माधुरी, तुषारचा अहवाल निगेटिव्ह
दरम्यान, कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणालाही सेटवर येण्याची परवानगी नसल्याचे अरविंद राव यांनी सांगितले. नियमानुसार माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचीही चाचणी करण्यात आली. दोघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असेही ते म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या व मृत्यूने वाढवली चिंता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या