कानपूर : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तवचा मुख्य सल्लागार अजित सक्सेनाकडे पाकिस्तानातील मोबाइल नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता. राजू आणि सक्सेना यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
व्हॉट्सअॅप कॉल करणा-याने हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारींसारखी अवस्था करण्याची धमकी दिली होती. सक्सेना यांनी बर्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रीवास्तव म्हणाला की, ‘जेव्हा भारतावर पाकिस्तान आणि चीनकडून हल्ला केला जातो, त्यावेळी मी सुद्धा प्रचंड संतापतो. माझा राग कॉमेडीच्या माध्यमातून निघत असतो. शत्रूंना कॉमेडीतून फटकारतो. मला धमकावले जात आहे.
माझी अवस्था लखनौच्या कमलेश तिवारींसारखी केली जाईल. माझ्या मुलांना मारले जाईल, पण मी माझ्या देशाबद्दलच बोलेन. मी माझ्या पद्धतीने काम करत आहे. माझ्या देशाचे जवान सर्जिकल स्ट्राइक करतात, तेव्हा मी खूप खूश होतो.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला