20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमनोरंजनबोटीवर सुटी घालवताना दिसले दीपिका-रणवीर

बोटीवर सुटी घालवताना दिसले दीपिका-रणवीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यात दुरावा आला आहे, ते विभक्त होतायत अशा अनेक अफवांवर रणवीरने एक व्हीडीओ पोस्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे.

ब-याच दिवसांनी रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणसोबतचा एक व्हीडीओ इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. ज्यामध्ये दीपिका आणि तो एका यॉटवर प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हीडीओ ते परदेशात आऊटिंगसाठी गेल्याचे दर्शवत आहे.

हा व्हीडीओ रणवीर सिंगने शेअर केला आहे. रणवीर सिंगने व्हीडीओ पोस्ट करत ‘गुड व्हायब्स’ टॅग देखील जोडला आहे. यात दीपिका एका यॉटवर रणवीरच्या समोर बसलेली दिसते. ती पांढरा टी-शर्ट, पांढरे शूज आणि सॉक्ससह काळ्या शॉर्टस्मध्ये आहे.

रणवीर तिच्यासोबत पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पँटमध्ये आणि नियॉन रंगाच्या चप्पलमध्ये दिसत आहे. दोघांनी आपले ड्रेसिंग एकदम मॅचिंग ठेवलेले आहे. ते यॉटवर त्यांचा वेळ एन्जॉय करत असताना दिसले तर व्हीडीओत दीपिका तिच्या पतीसोबत बोट चालवतानाही दिसली. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या